B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पारोळा शहरातील अनेक समस्या न सुटल्यास भाजपा तर्फे आमरण उपोषण..

0

पारोळा शहरातील अनेक समस्या न सुटल्यास भाजपा तर्फे आमरण उपोषण..

पारोळा —शहरातील नागरीकांच्या जिवाशी खेळण्याचे काम गेल्या दोन अडीच वर्षांपासुन सुरू आहे. हे सर्व पारोळा नगर पालीका व प्रशासक करीत आहेत. पारोळा शहरात अनेक समस्या आहेत या समस्यांबाबत आज दिनांक 27 जून रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचे कर्मचारी यामिनी जटे यांना भारतीय जनता पार्टी तर्फे समस्या सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. समस्या न सुटल्यास भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.विशेष समस्या पारोळा शहरात १५-१५ दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. याबाबत संपुर्ण पारोळा शहरात ७ दिवसा आड पाणी येईल असे नियोजन करावे, गटारी तुडूंब भरलेल्या आहेत,घाणीचे सम्राज्य पसरले आहे,शहरात डासांचे प्रमाण वाढले आहेत, शहरातील नगर पालीका मालकीचे हॅण्ड पंप बंद अवस्थेत पडलेले आहे, प्रत्येक गल्लीत घाणीचे साम्राज्य आहे, शहरातील व हायवे कडील बरेचशी स्ट्रीट लाईट बंद स्थीतीत आहे व त्याचे टर्मिनल बॉक्स उघड्या अवस्थेत आहेत, अमळनेर रस्त्यालगत पासुन ते महावितरण पर्यंत स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहेत, आझाद चौक ते धरणगाव चौफुली धरणगाव चौफुली तर बायपास धरणगाव चौफुली पर्यंत पथदिवे बंद आहेत,पारोळा शहरात व नवीन वसाहतीमध्ये धुरळची फवारणी व्हावी, पाईप लाईन टाकण्यासाठी नगरपालीकेले सर्व पारोळा शहर खोदुन ठेवले आहे सर्व रस्ते खाली वरती झाले आहेत. त्या सर्व रस्त्यांची दुरूस्ती व्हावी व त्यांना सपाट करण्यात यावे.या सर्व नागरी समस्यांचे निराकरण व्हावे. नाहीतर भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव प्रांताधिकारी प्रांत कार्यालय, एरंडोलतहसिलदार , तह‌सिल कार्यालय, पारोळा यांना देण्यात आल्या आहेत सदर निवेदनावर रविंद्र भोमा पाटील तालुका अध्यक्ष, भाजपा, पारोळा मुकूंदा भिका चौधरी शहर अध्यक्ष, भाजपा, माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे, सुरेंद्र बोहरा,सचिन रमणलाल गुजराथी,भावडू राजपूत,नरेंद्र गंगाधर साळी,धिरज दशरथ महाजन,संकेत प्रविण दाणेन, अतुल मुरलीधर पवार,मनोज चौधरी,पंकज छोटू ठाकुर,किरण नाना चौधरी, विनोद हिंदुजा, कैलास मनोहर चौधरी, युवराज पाटील,भागवत आधार चौधरी,विनीत पाटील, स्टॅम्प वेंडर राजेंद्र लक्ष्‍मण चौधरी, पिंटू चौधरी, गोकुळ चौधरी, मनोज चौधरी, भरत राजपूत,समिर वैद्य, यांच्यासह भारतीय जनता पार्टी, पारोळा शहर व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.