B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
राजपूत समाजासाठी “महाराणा प्रतापसिह आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करा डॉ संभाजीराजे पाटील यांचे उपमुख्यमंत्र्यांची निवेदनाद्वारे मागणी
पारोळा येथील सामाजिक व अजित पवार गटाचे डॉक्टर संभाजी रजे पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील राजपूत समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास असून शेती किंवा छोटे उद्योग , व्यवसाय करून आपली उपजीविका करीत असतो. यासाठी मागील वर्षी संभाजीनगर येथे झालेल्या समस्त राजपूत समाज मेळाव्याप्रसंगी मा. मुख्यमंत्री यांनी या समाजाच्या सहकार्यासाठी “महाराणा प्रतापसिह आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्याची घोषणा देखील केली होती. या अनुषंगाने सुरू अर्थसंकल्पात महामंडळ स्थापनेचा निर्णय करून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या समस्त राजपूत समाजाला दिलासा द्यावा यासाठी डॉ संभाजीराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन राजपूत समाजाच्या समस्या सविस्तर मांडून आर्थिक महामंडळ लवकर तसेच याच आधिवेशनात व्हावे ही मागणी केली. या महामंडळ मुळे समस्त महाराष्ट्रभरातील राजपूत समाजाला मोठा दिलासा मिळेल. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक अरविंद मानकरी , धरणगाव रांका तालुकाध्यक्ष बाप्पुसाहेब आर आर पाटील. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी जिल्यातील पालकमंत्री गुलाबरावजी पाटील तसेच मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची डॉ संभाजीराजे पाटील भेट घेण्यात आली यांच्या निवेदनाची दखल घेत शासन लवकरच महामंडळ स्थापने बाबत योग्य पाऊल उचलेल असे आश्वासित करण्यात आलेडॉ संभाजीराजे पाटील ऍक्टिव्ह मोड वर …कालच राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सामील झालेले डॉ संभाजीराजे पाटील आपल्या मतदार संघासाठी ऍक्टिव्ह मोड वर काम करताना दिसत आहे. नुकतेच सिंचन प्रकल्पासाठी भेट घेत त्यांनी निवेदन सादर केले होते त्याचबरोबर आता इतर मागण्यासाठी चे निवेदन देऊन पुन्हा ऍक्टिव्ह मोड वर दिसत आहेत.