B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पारोळ्यात कुटीर रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित केला आहे
रक्तदान शिबिरामध्ये महिलांनी सुद्धा रक्तदान केले.
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुटीर रुग्णालय येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आज रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले आहे.प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही ४ ते १९ जानेवारी पर्यंत हे रक्तदान महायज्ञ पार पडत आहे.त्या अनुषंगाने आज ११ जानेवारी पारोळा कुटीर रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न होत आहे.महाराष्ट्रात सिकलसेल, ॲनेमिया,हिमोफिलीया, पॅलेसेमिआ,ब्लड कॅन्सर,किडनी फेल्युअर रुग्ण जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताचीआवश्यकता असते.यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे या संप्रदायामार्फत निश्चित केले आहे.त्या अनुषंगाने ११ जानेवारी आज शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान कुटीर रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.शिबिरात सहभागी दात्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटन एरंडोल पारोळा मतदार संघाचे आमदार अमोल पाटील यांनी केले यावेळी खुशाल पाटील, भगवान चौधरी, ईशान भालेराव, धनराज खैरनार,प्रकाश पवार, महेश साळी उपस्थित होते तसेच शिबिरात जास्तीस जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.